पिंपरी-चिंचवड : पिंपळे गुरव येथील गोविंद गार्डन परिसरात 30 मीटर बाय 2000 मीटर परिसरात महापालिका जॉगिंग पार्क-गार्डनची निर्मिती करत आहे. हे काम पूर्णपणे बेकायदेशीर व सर्व नियम धाब्यावर बसवून चाललेले असल्याचा आरोप घर बचाओ संघर्ष समितीने केला आहे. समितीचे पदाधिकारी विजय पाटील, राजेंद्र देवकर, शिवाजी इबितदार, मोतीलाल पाटील, अमर आदियाल, तानाजी जवळकर, निलचंद्र निकम, राजेंद्र पावर आदिंनी प्रस्तावित रिंगरोडची पाहणी केली असता ही माहिती समोर आली.
प्रस्तावित एचसीएमटीआर रिंगरोडवर तोडगा काढण्याऐवजी नागरिक रहात असलेल्या जमिनीवर रस्त्याच्या नावाखाली कारवाई करायची आणि अनधिकृत असलेल्या जमिनीवर जॉगिंग पार्क सारखे प्रकल्प राबवायचे हे दुटप्पी धोरण महापालिकेने सुरू केले आहे. त्यामुळे पिंपळे गुरव येथील जॉगिंग पार्क कोणत्या नियमांच्या आधारे सुरू आहे, असा सवाल समितीने केला आहे.