गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर पुन्हा रुग्णालयात

0

पणजी-गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना कलंगुट येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीत पुन्हा बिघाड झाली आहे.

विधानसभेचे उपाध्यक्ष आणि भाजपा आमदार मायकल लोबो यांनी रुग्णालयात जाऊन पर्रिकर यांची भेट घेतली. पर्रिकर यांची प्रकृती ठीक असल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे ६ सप्टेंबरलाच अमेरिकेतून उपचार घेऊन पणजीला परतले होते. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ते उपचारासाठी अमेरिकेला गेले होते. या वर्षाच्या सुरुवातीलाच सुमारे तीन महिने अमेरिकेत त्यांच्यावर उपचार सुरु होते. सप्टेंबर महिन्यातच ते जेव्हा अमेरिकेहून परतले तेव्हापासून ते सराकारी बैठकीत सहभागी झाले नव्हते. घरातूनच ते काही फाइल्स पास करत होते अशीही माहिती समोर आली आहे. आता त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा एकदा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.