गोवा- गोवा भाजपचे अध्यक्ष विजय तेंडुलकर यांनी पक्षाच्या कोर कमिटीने उपसभापती मायकेल लोबो यांच्या विरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेतला गेल्याचे सांगितले आहे. उत्तर गोवा जिल्ह्यातील कालांगत मतदारसंघातील आमदार लोबो यांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आजारी असल्यापासून त्यांच्या अनुपस्थितीमुळे राज्य प्रशासन पूर्णपणे संपुष्टात आले असल्याचे सांगितले होते. या वक्तव्यावरून भाजपच्या कोअर कमिटीने त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. लोबो यांना याबाबत नोटीस पाठविली जाणार आहे.