गोव्यातील बीचवर जाऊन समुद्राच्या लांटांकडे बघत दारू पिण्याचा अनेकांचा प्लॅन असतो. मात्र आता यापुढे असे करू इच्छिणा-यांना महागात पडणार आहे. यापुढे जर तुम्ही गोव्याच्या बीचवर दारू पितांना आढळले तर तुम्हाला तुरूंगाची हवा खावी लागण्याची शक्यता आहे.
गोव्यातील भाजप सरकारने तसा आदेशच काढला आहे. त्यामुळे समुद्र किनारी दारू पिणा-या तळीरामांना आता चांगलाच चाप बसणार आहे. बीचवर दारू पिताना आढळल्यास दंडात्मक कारवाई किंवा तुरुंगवासाची शिक्षा करण्यात येईल असे सरकारने काल विधीमंडळात सांगितले.
राज्याचे पर्यटन मंत्री मनोहर आजगावकर सभागृहाला माहिती देत सांगितले की, ‘समुद्रकिनारे स्वच्छ हवेत. तेथे कोणतेही नियमबाह्य कृत्य केले जाऊ नये, याची आम्ही काळजी घेत आहोत. समुद्रकिनार्यानवर दारू पिणार्यांकनाही आम्ही रोखत आहोत. वेळप्रसंगी समुद्रकिनार्याकवर दारू पिणार्यांुना अटकही केली जाऊ शकते. पोलिसांनी यापूर्वी असे काही गुन्हे दाखलही केले आहेत.
‘पर्यटक व्यापार कायद्यात दुरुस्ती करण्यात येणार आहे. अंमली पदार्थांच्या तस्करीची माहिती देण्यासाठी टूरिस्ट गाईड्सची ‘जागले’ म्हणून मदत घेण्यात येईल. कोणालाही कायदा हाती घेऊ दिला जाणार नाही.’आता गोवा सरकारनेच असा आदेश काढला आहे म्हटल्यावर यामुळे अनेक हौशी पर्यटकांचा हिरमोड होणार असल्याचे चित्र आहे. मात्र या आदेशाची अंमलबजावणी कशी होते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.