गोव्यात पोलिसासह पर्यटकांचा बुडून मृत्यू

0

पणजी: गोव्यातल्या कलंगुट बीचवर महाराष्ट्रातले पाच जण बुडालेत. हे पाचही जण अकोल्याचे आहेत. यापैकी तिघांचे मृतदेह मिळाले असून, अन्य दोघांचा शोध अद्याप सुरू आहे. मृतांमध्ये प्रितेश नंदागवळी या पोलीस हवालदाराचाही समावेश आहे. चेतन नंदागवळी, उज्वल वाकोडे अशी मृतांची नावं आहेत. तर किरण मस्के, सुरज वैद्य यांचा शोध सुरू आहे. पाऊस असल्याने शोधकार्यात अडथळे येताय आहेत. हे पाचही जण सहलीसाठी गोव्याला गेले होते.