पणजी:– गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय म्हणजे राजकीय चूक होती, असे गोव्याचे माजी मुख्यमंत्री व गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केले आहे.
सरदेसाई यांनी या निर्णयाबद्दल लोकांची माफी मागितली आहे. विजय सरदेसाई यांनी गोव्यातील फतोरदा मतदारसंघात लोकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना विजय सरदेसाई म्हणाले, “राज्यातील भाजपाचे सरकार अकार्यक्षम, अपारदर्शक व प्रशासकीय उत्तरदायीत्व नसलेले सरकार आहे. भविष्यात असे सरकार स्थापन करण्यास कोणतीही मदत करणार नाही.
२०१७ साली गोवा विधानसभेची निवडणूक झाली होती. ४० सदस्य संख्या असलेल्या गोवा विधानसभेत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी मनोहर पर्रिकर हे संरक्षण मंत्री पदाचा राजीनामा देऊन गोव्यात परतले. त्यांनी गोवा फॉरवर्ड, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष व अपक्ष आमदारांच्या पाठिंब्याने राज्यात भाजपाचे सरकार स्थापन करत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती.