गोव्यामध्ये सिमेंट ब्लॉक कंपनीत स्फोट; 9 जण जखमी

0

पणजी : गोव्यामध्ये सिमेंट ब्लॉक कंपनीमध्ये मोठा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. ट्वेम इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये सिमेंटच्या ब्लॉक तयार करणाऱ्या कंपनीत दुपारी अचाकन स्फोट झाला. या स्फोटामध्ये ९ कामगार जखमी झाले असून त्यामधील ३ जणांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, प्राप्त माहितीनुसार स्फोटानंतर फायर ब्रिगेडची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. हा स्फोट ऐवढा भीषण होता की या स्फोटामुळे कंपनीच्या भिंतींना तडे गेले आहेत.

ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी कंपनीमध्ये कामगार उपस्थित होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि अग्निशमन दलाने धाव घेतली. जखमी झालेल्या सर्व कामगारांना ताबडतोब नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामधील ३ जणांची प्रकृती गंभीर आहे. या स्फोटामुळे कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे तर कंपनीच्या बाहेर उभ्या असलेल्या गाड्यांचे देखील नुकसान झाले आहे.