धुळे । तालुक्यातील वरखेडे गावाचे शिवसेनेचे शाखा प्रमुख विजय नवल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने धुळ्यांतील पांझरा पोळ गोशाळेत शिवसेनेचे नेते तथा माजी नगरसेवक महेश मिस्त्री, रामालय ग्रुपचे गणेश मोरे यांच्या हस्ते गोमातेला चारा खावू घालण्यात आला.
वरखेडे गावातील एक सामान्य कुंटुबात जन्म झालेले विजय नवल पाटील यांना परीस्थितीची जाणीव असल्याने सर्व सामान्य माणसांच्या अडचणीमध्ये मदतीचा हात देत असतात. गोशाळेत झालेल्या कार्यक्रमा प्रंसगी संपादक राजेंद्र गद्रे ,धुळे ग्रामीणचे गजेंद्र पाटील, साई कृपा मार्बलचे मालक अमोल बाविस्कर, संदिप बाविस्कर, सुहास पाटील, निरंजन पवार, जयेश पाटील आदी उपस्थित होते.