गो-अन्नकोट उपक्रमात गोशाळांना मदत

0

पुणे । ‘श्री सालासर हनुमान चालिसा मंडळ’ आयोजित गो-अन्नकोट उपक्रमात 18 गोशाळा, 11 दिव्यांग-नेत्रहीन व्यक्ती आणि दिव्यांग-दृष्टीहिनांसाठी कार्यरत 10 संस्थांना मदत करण्यात आली. स्वयंरोजगाराच्या चालना देणार्‍या वस्तूही भेट देण्यात आल्या. हा कार्यक्रम शनिवारी (दि.4) सायंकाळी रेणुका स्वरूप प्रशाला (मुलींची) सदाशिव पेठ येथे झाला. यावेळी मिलिंद एकबोटे, नगरसेवक रवींद्र माळवदकर, नगरसेवक योगेश समेळ, नगरसेविका गायत्री खडके, साई बालाजी एज्युकेशन सोसायटीचे संचालक प्रा. मनिष मुंदडा, महेश सहकारी बँकेचे संचालक पुनमचंद्र धूत, झुंबरलाल सारडा, जुगलकिशोर पुंगलिया, प्रतीक्षा बिहाणी, विष्णुकुमार चमाडीया, नरेश जालान यांच्या उपस्थितीत झाला.

10 सामाजिक संस्थांना स्वयंरोजगारासाठी साहित्य
दिव्यांग-दृष्टीहिनांना, संस्थांना दैनंदिन जीवनातील विविध वस्तू देण्यात आल्या. त्यात पिठाची चक्की, फ्रीज, मिक्सर, कुकर, पंखे, शिलाई मशीन, स्कॅनर, वाद्ये, किराणा सामान, कपाटे, गाद्या अशा अनेक गोष्टींचा समावेश होता. वेगवेगळ्या हनुमान मंदिरात झालेल्या या पठणाच्या आरती दरम्यान अर्पण झालेल्या पैशांतून अनेक सामाजिक उपक्रम मंडळाकडून आयोजित केले जातात. गो अन्नकोट उपक्रमात 18 गोशाळांना 9 हजार किलो धान्य देण्यात आले. 11 दिव्यांग-नेत्रहीन व्यक्ती आणि 10 सामाजिक संस्थांना स्वयंरोजगारासाठी उपयुक्त साहित्य देण्यात आले.

मंडळाचे यंदाचे 11 वे वर्ष
मंडळाचे यंदाचे 11 वे वर्ष आहे. आधी भक्तांच्या घरी हा उपक्रम होत असे पण गेल्या 2-3 वर्षांपासून जास्तीत जास्त लोकांनी यात सहभाग घ्यावा या हेतूने पुणे व पुण्याजवळील विविध मंदिरामध्ये, सोसायटीमध्ये, वृद्धाश्रमात हा उपक्रम राबवण्यास सुरुवात करण्यात आली. यंदा श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर, महालक्ष्मी मंदिर सारसबाग, नारायणी धाम लोणावळा, भिकरदास मारुती मंदिर, संगमनेर, अशा विविध मंदिरांचा देखील समावेश आहे.