गो मातेला चारा खाऊ घालून वाढदिवस साजरा

0

शिरपूर । वाढदिवस सांगितल्यावर प्रत्येक व्यक्तीचा व लहाण्यांचा आयुष्यातला एक विशेष उत्सहाचा दिवस उजळतो पूर्वी वाढदिवसाच्या दिवशी नवे कपडे घालून थोरामोठ्यांचे व घरातील आजी आजोबा , आई बाबा , काका काकू यांच्या आशिर्वादाने दिवस न्हाऊन निघायचा मित्र मैत्रिणींच्या व नातेवाईकांच्या मिळालेल्या शुभेच्छांना उत्साह वाटते वाढदिवस म्हणजे घरीच गोड पदार्थचा मिष्टान्न खाऊ घालायचे परंतु आजच्या युगात वाढदिवस साजरा करण्याचा कल बद्दला वाढदिवस सांगितल्यावर आयपत प्रमाणे महागडा केक आणने , रंगीबेरंगी फुग्यांनी व पताक्यांनी हाँल सजविणे केक वर मेणबत्त्या लावून त्या विझवून वाढदिवस साजरा करतात तसेच घरी मेजवानी न करता मित्रपरिवारासह हाँटेलात जाऊन जेवण करतात वाढदिवसाच्या दिवशी अफाट खर्च होतो अशा गोष्टी न करता बळसाणे गावाचे ललित जैन यांचे सुपुत्र राहुल याने 10 जून रोजी 15 वा वाढदिवसाचा वायफळ खर्च न करता लहान भावंडांना सोबत घेऊन जळगाव च्या गौ शाळेत गौ मातेला चारा खाऊ घालून वाढदिवस आनंदात साजरा केला यात रोनक , भुमिका व तनिष्का यापुढे वाढदिवसाला वायफळ खर्च न करता आपल्या परिस्थिती नुसार गौ मातेला चारा घालने व अंध अपंगांना किंवा मतिमंदांना जेवू घालून वाढदिवस साजरा करायचा असा संदेश राहुल जैन याने दिला याकामी सुरेशचंद जैन, ललित जैन , गणेश जैन, आतिष ओसवाल निर्मल संचेती, रोशन ओसवाल , गणेश ओसवाल , हार्ष ओसवाल, विश्वास पाटील, भुषण जैन , मयुरेश कवाड यांचे मार्गदर्शन लाभले.