गो-मातेला राष्ट्रमातेचा दर्जा देण्याची मागणी

0

धुळे । भारतीय परंपरेत गायीला अनन्य साधारण महत्व असून गो-मातेला राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा या मागणीसाठी आज श्री द्वारकाधीश प्रतिष्ठानच्या वतीने शहरात रॅली काढण्यात आली. शिवाय, जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदनही देण्यात आले. श्री द्वारकाधीश प्रतिष्ठानचे अध्यक्ष परमगोभक्त रविंद्रबापु शेलार, नगरसेवक अमोल मासुळे यांच्या नेतृत्वात सकाळी 11 वाजता संतोषी माता चौकातून पायी रॅली काढण्यात आली. गो-मातेला राष्ट्रमाता सन्मान मिळण्यासाठी घोषणा देत ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली. तेथे प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

शेतकर्‍यांना शेणमुल्य द्या
या निवेदनात गो-मातेला राष्ट्र मातेचा दर्जा मिळण्यासह गायीचे शेण हे शेतात खत तसेच गॅस, डिझेल व पेट्रोलला पर्याय म्हणून वापरण्या योग्य असल्याने शेतकर्‍यांना शेणमुल्य मिळावे,10 वर्षांआतील मुला-मुलींना गायीचे दूध मोफत वितरणाची व्यवस्था व्हावी, गायींसाठी स्वतंत्र चराऊ कुरण निर्माण करावे, विदेशी जर्शी गायींना भारतीय गाय म्हणून बिंबविण्याचा प्रयत्न होत आहे. त्याला प्रतिबंध करावा अशीही मागणी या निवेदनात केली. जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देतांना रविंद्रबापु शेलार, अमोल मासुळेंसह शाहिर भटू गिरमकर, प्रविण अग्रवाल, मिना भोसले, भगवान गवळी, लखन गोराड, मनोज सरगर, दत्तु थोरात, कपिल शर्मा, नैनेश रुणवाल, हितेश वर्मा, नितीन आखाडे, पंकज बागुल, कुणाल सोनवणे, मुकेश थोरात, निलेश खेमनर, वासुदेव पाटील, चंदु पाटील, राजु सुपनर आदी उपस्थित होते.