नागनाथ बोंगरगे यांचे आवाहन
राजगुरुनगर : वाढता उन्हाळा, पाण्याचे मर्यादीत स्त्रोत यामुळे बुट्टेवाडी ( ता. खेड ) येथील गो शाळेतील गायींचा सांभाळ करण्यात समस्या येऊ लागल्या आहेत. गोप्रेमी दानशूर नागरीक आणि संस्थानी या उपक्रमास सढळ हस्ते मदत करावी , असे आवाहन धर्मवीर संभाजी महाराज गोशाळा ट्रस्टच्या वतीने भारतीय गोवंश रक्षण समितीचे प्रांताध्यक्ष राजेंद्र लुंकड व विश्व हिंदू परिषदेचे पश्चिम प्रांत गोरक्षाप्रमुख नागनाथ बोंगरगे यांनी केले आहे.
गो शाळेत 40 गाय- वासरे
या गोशाळेत सुमारे चाळीस गायी व वासरे असून या सर्वांची कत्तलखान्यातून सुटका करण्यात आली आहे. तसेच या गोशाळेत जनावरांची संख्या वाढत आहे. त्यामुळे गायींसाठी निवाराशेड तयार करणे गरजेचे आहे. देशी गोवंश रक्षण या हेतूने या गोशाळचे कार्य सुरु असून नागरिकांनी याकामी सहकार्य करुन सढळ हस्ते मदत करावी , तसेच आर्थिक मदतीशिवाय जनावरांसाठी चारा , पाणी साठवण टाक्या किंवा निवाराशेड बांधकामाचे साहीत्य दिल्यास त्याचाही योग्य उपयोग होईल असे , धर्मवीर संभाजी गोशाळा ट्रस्टचे अध्यक्ष संजय बुट्टे व कार्याध्यक्ष दत्तात्रय सांडभोर यांनी सांगितले.