गौण खनिज वाहतूकदारांची 3 रोजी तहसिलवर मोर्चा

0

चोपडा : तापी नदी पात्रातील वाळु उपसा करण्याची मुदत गेल्या दोन महिन्यापुर्वी संपल्यावर तालुक्यात ठेकेदार, व्यावसायिक तसेच नागरिकांना वाळु अभावामुळे बांधकाम करणे अवघड झाले असुन गौण खणीज वाहतुकीचा परमिट तहसिल कार्यालयात मिळावे या मागणीसाठी मंगळवार 3 जानेवारी रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचा विश्रामगृहापासून सकाळी 11 वाजता तहसिल कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात असुन मोर्चाचे परवानगीचे निवेदन नायब तहसिलदार डॉ. स्वप्निल सोनवणे देण्यात आले. यावेळी राकेश पाटील , हरीष पवार, अमोल जैन, प्रदिप शहा, धनराज पाटील, राहुल सोनवणे आदी उपस्थित होते.

चोपडा तालुक्यात गौण खनिज वाहतूक बंदची मागणी
चोपडा तालुका गौण खनिज वाहतुक करणारे वाहन मालकांना वाळु, मुरुम, डबर, माती, गळ, आदी गौण खनिज वाहतूक करण्यासाठी शासनाचे महसुल विभागामार्फत परमिट देण्यात यावे तसेच तापी नदी मधील वाळुचा लिलाव पध्दत बंद करून शासनाने एक ब्रास वाळुची किंमत ठरवुन तहसिल कार्यालयातुन परमिट देण्यात यावे त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांना देखील लहान मोठे बाधंकाम करण्यासाठी परवडणार आहे. त्यासाठी शासनाने सर्व प्रथम लिलाव पध्दत बंदच केली पाहिजे. या मागणीसाठी मंगळवार 3 जानेवारी रोजी मोर्चा काढण्याची परवानगी मागीतली असुन या मोर्चासाठी तालुक्यातून गौण खणिज वाहतूक करणारे वाहन मालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मनिष गुजराथी यांनी केले आहे.