गौतम गंभीरचा दिल्लीच्या कर्णधारपदावरुन पायउतार

0

नवी दिल्ली :- गौतम गंभीरने दिल्लीच्या कर्णधारपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएलच्या अकराव्या हंगामात दिल्ली डेअरडेविल्स संघाची कामगिरी फारशी चांगली झालेली नसल्याने गौतमने पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघ सोडून तब्बल ८ वर्षांच्या कालावधीनंतर गौतम गंभीरने आपल्या स्वगृही पुनरागमन केलं होते. गौतमच्या अनुपस्थितीत श्रेयस अय्यर दिल्लीचा नवा कर्णधार असणार आहे.संघ प्रशासन, मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटींग यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

२००८-२०१० या कालावधीत गौतम दिल्लीच्या संघाकडून खेळला होता. तब्बल आठ वर्षानंतर गौतमने आपल्या स्वगृही पुनरागमन केलं होते. गौतमने आतापर्यंत दिल्लीच्या संघाने जी काही कामगिरी केली आहे, त्याची कर्णधार या नात्याने मी जबाबदारी स्विकारतो आहे. त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये मी कर्णधारपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटींग यानेही गौतमच्या निर्णयाला आपला पाठींबा दर्शवला आहे.