गौतम बुद्धांचे ‘पाली त्रिपिटक’ आता मराठीत

0

पुणे : भगवान गौतम बुद्धांचे पाली त्रिपिटक या तीन खंडांत असलेले मूळ उपदेश, विचार आता मराठीत भाषांतरित केले जाणार आहेत. त्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पाली विभाग व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्यात बुधवारी सामंजस्य करार करण्यात आला. कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, ‘बार्टी’चे महासंचालक कैलास कणसे, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, पाली विभागप्रमुख डॉ. महेश देवकर उपस्थित होते.

करारानुसार बुद्धांचे उपदेश संकलित असलेले ‘पाली तिपिटका’ या तीन खंडांचे मराठीत भाषांतर केले जाणार आहे. डॉ. देवकर म्हणाले, प्रकल्पासाठी राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्यता विभागातर्फे ‘बार्टी’च्या माध्यमातून 4.95 कोटी उपलब्ध करून दिले आहेत. हा भाषांतराचा प्रकल्प पाच वर्षांसाठी असणार आहे. ‘पाली त्रिपिटक’च्या संपूर्ण तीन खंडांचे मराठीत भाषांतर केले जाईल. यामुळे बुद्धांचे विचार आता मराठीत जाणून घेणे शक्य होणार आहे.