गौथमच्या धडाकेबाज फलंदाजीने राजस्थान रॉयल्सचा विजय

0

जयपूर : ११ व्या सत्राच्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सने संजू सॅमसन (५२) आणि गौथमच्या (नाबाद ३३) झंझावाती खेळीच्या बळावर शानदार विजय मिळविला. राजस्थान संघाने ७ गड्यांच्या मोबदल्यात विजयाचे लक्ष्य सहज गाठत मुंबई इंडियन्सला पराभूत केले.

मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर २० षटकांत ७ बाद १६७ धावा केल्या. यामध्ये यादव व किशन या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी १२९ धावांची भागीदारी केली. किशनने ४२ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकार खेचत ५८ धावा केल्या. त्यापाठोपाठ यादवही जयदेव उनाडकतच्या गोलंदाजीवर बाद झाला. यादवने ४७ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ७२ धावा केल्या. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा भोपळाही न फोडता धावबाद होऊन माघारी परतला.अखेरच्या पाच षटकांत मुंबईला केवळ ३२ धावाच जोडता आल्या. विजयाचा पाठलाग करीत श्यक्य वाटणारे लक्ष्य राजस्थान रॉयल्स संघाने ७ गड्यांच्या मोबदल्यात विजय मिळविला.

धावसंख्या
मुंबई इंडियन्स : ७ बाद १६७ (सुर्यकुमार यादव ७२, इशान किशन ५८, किरॉन पोलार्ड नाबाद २१; जोफ्रा आर्चर ३/२२, धवल कुलकर्णी २/३२)

वि. राजस्थान रॉयल्स : (संजू सॅमसन ५२, बेन स्टोक्स ४०, के. गौथम नाबाद ३३; जसप्रीत बुमरा २/२८, हार्दिक पंडय़ा २/३१)