गौरीसाठी ५ वर्षे हिंदू बनला शाहरुख

0

मुंबई : बॉलीवूडच्या बादशाह शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान यांची लव्हस्टोरी बॉलिवूडमधील एक आदर्श लव्हस्टोरी म्हणून पाहिली जाते. जेव्हा शाहरुख खानकडे काहीही न्हवते तेव्हा गौरीने त्याला आपला लाईफ पार्टनर म्हणून निवडला होता. मात्र, यादरम्यान या दोघांनाही अनेक गोष्टींचा सामना करावा लागला होता. शाहरुख आणि गौरीच्या लग्नाचा प्रवास प्रचंड खडतर होता. या कपलच्या २५ व्या अॅनिवर्सरीनिमित्त त्यांचा हाच प्रवास जाणून घेण्यासाठी चाहतेही नक्कीच उत्सुक असणार.

शाहरुखने १८ वर्षांचा असताना गौरीला पहिल्यांदा एका पार्टीत डान्स करताना पाहिलं. तेव्हाच त्याने गौरीला विचारले, मात्र त्यावेळी गौरीने त्याला नकार दिला कारण तिच्यासोबत तिचा भाऊ होता. यानंतर काही दिवसातच त्यांच्या नात्याला सुरुवात झाली. काही काळानंतर या दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, शाहरुख मुस्लीम आणि गौरी हिंदू असल्याने गौरीचे पालक यासाठी तयार न्हवते. म्हणूनच, गौरीच्या पालकांना इम्प्रेस करण्यासाठी शाहरुखने ५ वर्षे हिंदू असल्याचं नाटक केलं. यानंतर शाहरुखच्या स्वभावावर गौरीचे पालक इम्प्रेस झाले आणि २५ ऑक्टोबर १९९१ ते दोघेही विवाहबंधनात अडकले. गेल्या २५ वर्षांपासून ही जोडी बॉलिवूडची आइडल कपल म्हणून ओळखली जाते.