बेंगळुरू : पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या होऊन तीन दिवस उलटले तरी त्यांचे मारेकरी अद्याप मोकाटच आहेत. त्यांची हत्या 5 सप्टेंबरच्या रात्री करण्यात आली. त्यानंतर लवकरात लवकर मारेकरी पकडले जातील अशी घोषणा कर्नाटक सरकारने केली होती. मात्र तीन दिवस उलटूनही गौरी लंकेश यांचे मारेकरी मोकाटच आहेत.
गौरी यांच्या मारेकर्यांबाबत माहिती किंवा पुरावे सादर करणार्याला 10 लाखांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे. तरीही या प्रकरणी पोलिसांना कोणतेही धागेदोरे अद्याप हाती लागलेले नाहीत. याप्रकरणी 7 संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त आहे. मात्र मारेकर्यांपर्यंत पोहचण्यात पोलिसांना यश आलेले नाही. गौरी यांना ठार केले त्यावेळेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती समोर आली आहे.