बंगळुरु- कन्नड पत्रकार आणि लेखिका गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी चौकशी करणार्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) धक्कादायक खुलासा केला आहे. लंकेश यांच्या मारेकर्यांनी दाक्षिणात्य अभिनेते प्रकाशराज यांच्याही हत्येचा कट रचला होता. एसआयटीच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
Bengaluru: Gauri killers planned to eliminate actor Prakash Rai, reveals SIT probe https://t.co/a3AEfE5vZK ….Look at the narrative to silence voices.. my VOICE will grow more STRONGER now .. you cowards …do you think you will get away with such HATE POLITICS #justasking pic.twitter.com/tIZd5xoOvq
— Prakash Raj (@prakashraaj) June 27, 2018
दरम्यान, प्रकाशराज गेल्या काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारवर कडाडून टीका केली होती. तेव्हापासून ते मारेकर्यांच्या निशाण्यावर आहेत. एसआयटीच्या अहवालानुसार, प्रकाश राज मागील काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी व हिंदुत्ववादी संघटनांवर सातत्याने टीका करत आहेत. त्यामुळे गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांचा प्रकाशराज यांनाही संपविण्याचा कट होता.
दरम्यान, गेल्यावर्षी पाच सप्टेंबरला गौरी लंकेश यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत प्रकाशराज यांनी पुन्हा एकदा सरकार सडकून टीका केली आहे. अशा प्रकारच्या धमक्यांना मी काही घाबरत नाही. उलट या धमक्यांमुळे माझा आवाज आणखी प्रबळ होईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी ट्विटरवरून दिली आहे.