भुसावळात जागर प्रतिष्ठानतर्फे ग्रंथपूजन व जागर गौरव सोहळा
भुसावळ- समाजात खर्या अर्थाने जागृती घडवून आणायची असेल तर पुस्तकांचे महत्त्व अनन्यसाधारण आहेफ अगदी लहानपणापासून विविध प्रकारची पुस्तकेसंस्कार मय घडवणारी असल्याने या पुस्तकांचा मनुष्याचे व्यक्तिमत्त्व घडविण्यात खूप मोठा मोलाचा वाटा असतो त्यामुळे या पुस्तकांचा जागर करणे ही एक सशक्त समाज घडविण्यासाठी आजची गरज असल्याचे प्रतिपादन माजी महसूल मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी येथे केले. शहरातील ब्राह्मण संघात जागर प्रतिष्ठानच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त आयोजित जागर गौरव सोहळा व ग्रंथपूजन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
यांची व्यासपीठावर होती उपस्थिती
व्यासपीठावर प्रमुख वक्ते साहित्यिक माजी प्राचार्य डॉ.किसन पाटील यांच्यासह ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन महेश फलकएभुसावळ विभागीय पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर,जिल्हा परीषद सदस्य व शिक्षण समिती सदस्य रवींद्र नाना पाटील, जिल्हा परीषद सदस्य प्रभाकर अप्पा सोनवणे, काँग्रेस शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष प्रा.शैलेश राणे, माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, नगरसेवक प्रमोद नेमाडे, पिंटू ठाकूर आदी मान्यवरांची उपस्थिती होती. प्रारंभी सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून ग्रंथ पूजन करण्यात आले त्याप्रमाणे मान्यवरांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले त्यानंतर ऐनपूर येथील सरदार वल्लभाई पटेल विद्यालयातील शिक्षक महेंद्र भोई यांनी स्वलिखित जागर गीत सादर केले. प्रास्ताविक जागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.पंकज पाटील यांनी केले.
तिघांना जागर गौरव पुरस्कार 2018 प्रदान
सामाजिक व आरोग्य क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल भुसावळ येथील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ भारत विकास परीषदेच्या भुसावळ शाखाध्यक्ष डॉ.नीलिमा संजय नेहेते, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप वसंतराव पाटील आणि साहित्यिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल रमेश सरकाटे अशा तिघांना स्मृतिचिन्ह शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते जागर गौरव 2018 हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
यांनी घेतले परीश्रम
यशस्वीतेसाठी जागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.पंकज पाटील, उपाध्यक्ष श्रीराम सपकाळे, कोषाध्यक्ष ऋषिकेश पवार, सचिव प्रा.निलेश गुरुचल, कायदेशीर सल्लागार, अॅड.हरीष कुमार पाटील, संचालिका लीना पाटील, प्रमिला सोनवणे, जागर मित्र डॉ.जगदीश पाटील, पवन पाटील, गोकुळ सोनवणे, विलास पाटील, रमेश कोळी, निर्मला दायमा, ज्ञानेश्वर घुले, अमित चौधरी यांनी परीश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. निलेश गुरूचल यांनी तर आभार प्रा.जितेंद्र महंत यांनी मानले.