ग्रंथालयांना आवाहन

0

निगडी : येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे ग्रंथालयाच्या वर्धापन दिनानिमित्त ग्रामीण भागातील दोन ग्रंथालयांना पुस्तक रुपाने मदत करण्यात येणार आहे. त्यासाठी ग्रंथालयांनी अर्ज करावेत, असे आवाहन मंडळाने केले आहे. मंडळाचे सुसज्ज असे रवींद्रनाथ ठाकूर सार्वजनिक ग्रंथालय असून पंचेचाळीस हजारपेक्षा जास्त ग्रंथसंपदा असून तीन हजार सभासद याचा लाभ घेतात. वाचन चळवळ वाढीस लागावी. यासाठी ग्रंथालय अनेक उपक्रम राबविते. गरजू ग्रंथालय संचालकांनी 15 जानेवारीपर्यंत ग्रंथालयात अर्ज करावेत, असे आवाहन कार्यवाह विवेक जोशी यांनी केले आहे.