फैजपूर। येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात ग्रंथालय विभागात 26 वर्षांच्या प्रदिर्घ सेवापुर्तीनिमित्त साधना वाघुळदे यांना मधुस्नेह परिवारातर्फे निरोप देण्यात आला. याप्रसंगी तापी परिसर विद्या मंडळाचे उपाध्यक्ष प्रा.डॉ. एस.के. चौधरी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
ग्रंथालय विभागात केली 26 वर्षे प्रदिर्घ सेवा
मधुस्नेह परिवार संस्था आणि कर्मचारी इतका मर्यादित अर्थ न ठेवता परिवाराचा सदस्य म्हणून प्रत्येकाला भावनिक ऋणानुबंधात बांधून ठेवतो. सेवाकाळात प्रत्येकाला मत स्वातंत्र्य देवून एक आगळीवेगळी कार्य संस्कृती जोपासणारी संस्था म्हणून तापी परिसर विद्या मंडळाचा नावलौकिक आहे. सेवा समाप्तीनंतरही कर्मचार्याला ‘आपली संस्था’ असा विश्वास देवून कायम स्मरणात ठेवते. याचाच प्रत्यय ग्रंथालय विभागात गेली 26 वर्षे प्रदिर्घ सेवा बजावणार्या साधना वाघुळदे यांच्या सेवापुर्ती कार्यक्रमानिमित्त सर्व उपस्थितांना आला.
शारिरीक अपंगत्वावर केली मात
घरातून राजकीय व समाजसेवेचा वारसा लाभलेल्या साधना वाघुळदे यांनी शारिरीक अपंगत्वावर मात करीत धनाजी नाना महाविद्यालयात मोठ्या बहिणीचे अढळ स्थान निर्माण केले. अत्यंत वक्तशीर, मृदुभाषी आणि स्पष्टवक्ता असलेल्या साधना वाघुळदे यांना सेवापुर्ती निरोप देतांना सर्वांच्या भावना उचंबळून आल्या होत्या.
यांची होती उपस्थिती
कार्यक्रमास अध्यक्ष प्रा.डॉ. एस.के. चौधरी, उपाध्यक्ष, व्हा. चेअरमन, प्रा. के.आर. चौधरी, सचिव प्रा. एम.टी. फिरके,
नियामक मंडळ सदस्य प्रा. पी.एच. राणे, प्राचार्य प्रा.डॉ. पी.आर. चौधरी, उपप्राचार्य डॉ. ए.आय. भंगाळे, उपप्राचार्य डॉ. उदय जगताप, स्टाफ वेलफेअर समितीचे चेअरमन डॉ. जे.जी. खरात, प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समितीचे प्रमुख डॉ. जे.जी. खरात यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डॉ. एस.के. चौधरी यांनी साधना वाघुळदे एक आदर्श कर्मचारी म्हणून उल्लेख केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.डॉ. सागर धनगर यांनी तर आभार प्रा. सरला तडवी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.डॉ. जे.जी. खरात, प्रा. वाय.जी. वारके, प्रा.डॉ. सागर धनगर, प्रा. सरला तडवी, फरीद तडवी आदींनी परिश्रम घेतले.