ग्रामपंचायतींसाठी इ-ग्राम सॉप्टवेअर लवकरच

0

पुणेः सर्वसामान्य नागरिकांना पारदर्शक कारभाराची माहिती मिळावी सरकारी कार्यालये स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या कारभाराची पारदर्शकता नागरिकांना कळावी म्हणून शासन प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणून ग्रमापंचायतींमध्ये इ-ग्राम सॉफ्टवेअर लवकरच लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभाराची सर्वच्या सर्व 19 नमुने नागरिकांना ऑनलाइन पाहता येणार आहेत.  ग्रामपंचायतीमध्ये पूर्वी ‘संग्राम’ सॉफ्टवेअर वापरण्यात येत होते, त्याऐवजी आता नव्यानेच इ-ग्राम नावाचे सॉफ्टवेअर कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यामुळे आता ग्रामपंचायतीमधून पूर्वीच्या 28 ऐवजी 33 नमुने पाहायला  मिळणार आहे. नागरिकांना या सॉफ्टवेअरमुळे घरबसल्या दाखल्यांसाठी अर्ज  देखील करता येणार आहे.

या सॉप्टवेअरमुळे नागरिकांना गावाची करवसुली किती, गावाला वित्त आयोगातून किती अनुदान मिळाले,  तसेच ग्रामपंचायतीत किती कर्मचारी आहेत, गावांची लोकसंख्या किती आहे, गावांत वृक्ष संख्या किती, ग्रामसभेचे ठराव अशी संपूर्ण माहिती पारदर्शकपणे पाहता येणार आहे. त्याप्रमाणे जन्म-मृत्यू दाखला, विवाह नोंदणी दाखला, शौचालय वापरत असल्याचा दाखला, दारिद्य्र रेषेत असल्याचा दाखला, हयात दाखला, नमुना 8अ दाखला, निराधार दाखला, विभक्त कुटुंब दाखला, असे 33 प्रकारचे दाखले मिळणार आहेत. या सॉप्टवेअरमुळे नागरिकांचे कार्यालयातील हेलपाटे वाचणार आहेत.     मोबाइलवरून ही करता येणार ऑप्लिकेशन  नागरिकांना विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी या सॉप्टवेअरमुळे मोबाइलवरून ऑनलाइन ऑप्लिकेशन करता येणार आहे. त्यासाठी नागरिकांना इ-ग्राम अ‍ॅपच्या आधारे आपली कागदपत्रे ऑनलाइन सबमीट करावी लागणार आहेत नंतर त्याची पडताळणी करून संबंधित व्यक्तीच्या लॉगइन आयडीवर  ऑनलाइन दाखला मिळणार आहे. घरबसल्या नागरिकांना दाखल्यांसाठी आता अर्ज करता येणार आहे.

जिल्ह्यात 1407 ग्रामपंचायत आहेत, इ-ग्राम नावाचे हे सॉफ्टवेअर उपलब्ध करण्यात आले आहे. हे सॉफ्टवेअर नव्यानेच जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये बसविण्यात येत आहे. आतापर्यंत 196 ग्रामपंचायतीमध्ये हे सॉफ्टवेअर बसविण्यात आले आहे. उर्वरित ग्रामपंचायतीमध्ये लवकरच हे सॉफ्टवेअर बसविल्याने त्या भागातही दाखल्यांच्या ऑनलाइन सुविधा उपलब्ध होणार आहेत. – महावीर काळे, जिल्हा परिषद आपले सरकार सेवा केंद्राचे समन्वयक