ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या समस्या सोडविण्यासाठी चर्चा

0

भुसावळ । रावेर तालुक्यातील वडगाव येथे रावेर व यावल तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचार्‍यांची बैठक राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रीय सफाई मजदूर काँग्रेसचे विदर्भ अध्यक्ष मोतीचरण कंडेरा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

या बैठकीत ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना हक्काचे घर, प्रोव्हिडंट फंड नियिमत भरणे, 1 ते 5 तारखेपर्यंत पगार अदा करणे, एक हजार लोकसंख्येवर एक पुरुष व महिला सफाई कामगार नेमणे, रोजंदारी कर्मचार्‍यांना 240 दिवसांनंतर नियमाप्रमाणे कायम करणे, ग्रामपंचायत सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना पेन्शन मिळणे, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेचा लाभ मिळणे, कर्मचार्‍यांच्या वारसांना लाड / पागे समितीच्या निर्णयानुसार वारसा हक्क लागू करणे आदी मागण्यांवर चर्चा करण्यात आली. तसेच कर्मचार्‍यांच्या विविध समस्यांसंदर्भात सोमवार 17 रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांशी भेट घेवून त्या सोडविण्याची मागणी केली जाणार आहे.