पुणे – हल्लीच्या काळामध्ये निवडणुकीच्या प्रचाराला काय युक्त्या केल्या जातील याचा नेम नाही. शिरूर तालुक्यातील एका ग्रामपंचायतीच्या प्रचारात चक्क विराट कोहलीचा डमी उतरवण्यात आला आहे. त्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. शिरुर तालुक्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकांचे वारे वाहत आहे. प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरु आहे. या निवडणुकीतील रामलिंग ग्रामविकास पॅनलचा प्रचार करण्यासाठी विराट कोहलीचा डमी मैदानात उतरला आहे.
सौरव गाडे असे विराट कोहलीसारख्या दिसणाऱ्या तरूणाचे नाव आहे. रामलिंग ग्रामविकास पॅनलचे निवडणूक चिन्ह बॅट आहे. त्यामुळे हातात बॅट घेऊन हा ड्युप्लिकेट विराट कोहली पक्षाच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन करताना दिसत आहे.