कर्जत । राज्यात ऑक्टेबर 2017 मध्ये येऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुका भाजपासह अन्य पक्षांनी गांभिर्याने घेतल्याचे दिसून येत असताना ज्या पंचायत समितीवर सेनेने वर्चस्व प्रस्थापित केले व सभापती म्हणून ज्या वॉर्डमधून युवासेनेचे अमर मिसाळ निवडून आले व सभापतीपदी विराजमान झाले त्यांच ग्रामपंचायीत सेनेला निवडणुकीसाठी उमेदवार न सापडणे हा विषय संबंध तालुक्यात चर्चेचा ठरला असून सरपंच पदासाठी उमेदवाराची शोधाशोध सुरु आहे.
16 ऑक्टोबर रोजी निवडणूक
16 ऑक्टेबर रोजी होत असलेल्या निवडणुकीसाठी सर्वत्र जोरदार तयारी सुरू व शिवसेना पक्षप्रमुखांनीही नेते तसेच कार्यकर्त्यांना या निवडणुका गांभीर्याने घेण्याचे आदेश दिले आहेत. तर दुसरीकडे ज्या भाजपाला तालुक्यात पुरेसे कार्यकर्ते नाहीत तरीही त्यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीत सरपंचपदासह पुर्ण पॅनल उभे करण्याची धडपड सुरू केली आहे. तर नुकताच नेरळ येथे राष्ट्रवादी पक्षाची आ.सुरेश लाड यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली त्यावेळी त्यांनीही तालुक्यात होणार्या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला पाहिजे. भाजपा देशात व राज्यांत काही ठोस कार्य करू शकला नाही याबद्दल मतदारांना जागृत करण्याचे आदेश दिले.