ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आखाडा तापला

0

दुसर्‍या दिवशी 18 इच्छुकांचे अर्ज दाखल

भुसावळ– तालुक्यातील चार ग्राम पंचायतींच्या सार्वत्रिक तर पिप्रींसेकम निंभोरा ग्रुपग्राम पंचायतीसाठी पोटनिवडणूक होत आहे. निवडणुकीनिमित्ताने राजकीय आखाडा चांगलाच तापला आहे. गुरूवारी तीन ग्रामपंचायतीतील लोकनियुक्त सरपंच पदासाठी दोन इच्छूका तसेच अन्य सदस्य पदासाठी 16 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. वराडसीम जोगलखोरी, सुनसगाव- गोंभी, चोरवड खेडी बुद्रूक व गोजोरा या चार ग्राम पंचायतीच्या पंचवार्षीक निवडणूकीसाठी राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहे.