ग्रामपंचायत निवडणूक ; पहिल्या दिवशी एकही अर्ज नाही

0
यावल तालुक्यात हिवाळ्यात पेटला राजकीय आखाडा
यावल : तालुक्यातील सात ग्रामपंचायतीच्या सात सरपंच व 67 सदस्य निवडीसाठी  26 डिसेंबर निवडणूक होत आहे. अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी मंगळवारी इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. उमेदवारांना ऑनलाईन उमेदवारी अर्ज दाखल करावे लागत आहेत. तालुक्यातील साकळी येथील 17 , किनगाव खुर्द 11,गाड-या, बोरखेडा येथील प्रत्येकी 9 तर गिरडगाव, बोराळे, म्हैसवाडी, बोरखेडा  येथील प्रत्येकी सात जागा अशा 63 जागांसाठी निवडणूक होत आहे. दरम्यान, अनेक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लागणार्‍या कागदपत्रांची जमवाजमव केली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतीम मुदत 11 डिसेंबर आहे.