यावल तालुक्यात सरपंच निवडीसह 16 ठिकाणी पोटनिवडणूक
यावल- तालुक्यातील एका ग्रामपंचायतीच्या थेट सरंपच निवडीसह 16 ग्रामपंचायतीच्या एकुण 44 सदस्यांच्या जागेसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीत सोमवारी नामनिर्देशनपत्र दाखल होण्यास सुरुवात झाली मात्र पहिल्या दिवशी एकही अर्ज प्राप्त झाला नाही. ऑनलाईन राज्य निवडएूक आयोगाच्या संकेत स्थळावर उमेदवारांना अर्ज करावे लागत आहेत. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम मुदत 12 मे पर्यंत आहे.