ग्रामपंचायत सदस्यांच्या घराला आग; लाखोंचे नुकसान

0

शिंदखेडा । तालुक्यातील परसामळ येथील विद्यमान ग्रामंचायत सदस्य सारूबाई श्रावण भिल यांच्या घराला लागलेल्या आगीत धार्मिक कार्यासाठी जमवलेल्या 50 हजार रूपयांसह सर्वच संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. शनिवारी रात्री 1 वाजेनंतर लागलेल्या आगीमध्ये गोंधळाच्या कार्यांसाठी एकत्रित 50 हजार रूपये जळाले. याशिवाय टि.व्ही., संसारोपयोगी वस्तू, धान्य, 15 नव्या आहेराच्या साड्या व अन्य साधनसामुग्री जळून खाक झाली. रात्रीच परसामळ व कुमरेज ग्रामस्थांनी पाण्यासाठी नळ सुरू केले. सर्वांच्या मदतीने आग नियंत्रीत करण्यात यश आले. रात्रीच शिंदखेडा येथून अग्नीशमक बंब मागविण्यात आले.

रोजंदारीतून जमवले होते पैसे
आग लागली त्यावेळेस सारुबाई भिल ह्या बाहेर वट्यावर झोपल्या होत्या. तर त्यांचे पती श्रावण माना भील हे होळे येथील पाणीपुरवठा विहरीजवळ नदीत झाले होते. भील कुटूंबियांनी शेळ्या विकून तसेच श्रावण भील यांच्या रोजंदारीच्या पैशातून 50 हजार रूपये जमा केले होते. पुढील आठवड्यात गोंधळ कार्यक्रम होणार होता. त्यापुर्वींच लागलेल्या आगीने सव र् जाळून खाक केले. दरम्यान, रविवारी सकाळी मंडळाधिकारी दावले यांनी भेट देऊन सर्वतोपरी मदत मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले.