माजी मंत्री एकनाथराव खडसेंच्या पाठपुराव्याला यश
मुक्ताईनगर– माजी महसूल मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांच्या प्रयत्नांनी मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील मुक्ताईनगर, बोदवड तालुक्यातील रस्त्यांच्या कामासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत 16 कोटी 79 लाखांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. लवकरच रस्त्यांच्या कामांना सुरवात होणार असल्याची माहिती माजी मंत्री खडसे यांचे स्वीय सहाय्यक योगेश कोलते यांनी दिली.
या रस्त्यांचे उजळले भाग्य
मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील विकास कामांसाठी माजी मंत्री व आमदार खडसे यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून त्यांनी शासनाकडे वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत मुक्ताईनगर तालुक्यातील खामखेडा, पचाणे, मेळसांगवे, पचाणे रस्त्यासाठी सात कोटी 62 लाख तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा ते वढवे, कासारखेडा ते मेहुण संस्थान या रस्त्यासाठी सहा कोटी सात लाख असे एकूण मुक्ताईनगर तालुक्यातील रस्त्यांसाठी 13 कोटी 69 लाख तर बोदवड तालुक्यातील बोदवड, गोळेगाव खुर्द, पाचदेवळी, करंजी, गोळेगाव रस्त्यासाठी तीन कोटी 10 लाख मिळून 16 कोटी 79 लाख रुपयांचा निधी मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील रस्त्यांसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत मंजूर झाला आहे.