ग्रामसभेने ठराव केल्यास तातडीने बससेवा सुरू करू

0

शिरपूर। रत्याच्या दुतर्फा असलेली काटेरी झुडपे, विद्युत तारा लोंबकलेले नको तसेच ग्रामसभेचा ठराव केल्यास त्यागावत तातडीने बस सेवा सुरू केली जाईल असे आश्‍वासन येथील बस आगाराचे प्रमुख स्वाती पाटील यांनी तालुक्यातील सरपंचांच्या झालेल्या विशेष बैठकीत मार्गदर्शन करतांना सांगितले. तालुक्यातील सरपंचांची बैठक घेण्यात आली. स्थानक प्रमुख संदेश क्षीरसागर, वाहतुक निरीक्षक मनोज पाटील, बौध्दप्रिया भामरे, कार्यशाळा अधिक्षक बडगुजर आदी उपस्थित होते. स्वाती पाटील पुढे बोलतांना म्हणल्या की, प्रत्येक प्रवाशांचा महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाकडून अपघात विमा काढलेला असतो असे स्पष्ट केले.

अपघातातील जखमींना औषधोपचार
अपघात झाल्यानंतर खाजगी वाहतुक करणारे चालक व सहचालक पळून जातात. परंतु, दुर्देवाने बसचा अपघात झाल्यास संबंधीत विभागाचे अधिकारी हे जखमी प्रवशांना औषधोपचाराची सोय करून तात्काळ मदत करतात. काही गावांमध्ये रस्त्यावर असलेली दुतर्फा झाडे, बस फिरविण्यासाठी मुबलक नसलेली जागा व प्रवशांनी बसकडे फिरविलेली पाठ यामुळे नाईलाजास्तव तेथील बससेवा बंद करण्यात आल्या आहेत. प्रवाशी व ग्रामस्थांनी याबाबत सकारात्मक दृष्टीकोन ठेवून ग्रामसभेत रस्त्यांसह इतर सुविधांबाबत आवाज उठवून जास्तीत जास्त प्रवाशी महामंडळाच्या बसमधून कसा प्रवास करीतील याची जनजागृती केली तर निश्‍चितच बंद असलेल्या बससेवा पूर्ववत सुरू होतील. अडचणी या दोन्ही बाजूकडून आहेत. दोन्हींकडून सकारात्मक विचार केल्यास मार्ग निघू शकतो. रस्ता चांगला असेल, रस्त्याच्या दुतर्फा असलेली काटेरी झुडपे, विद्युत तारा लोंबकलेल्या नको तसेच ग्रामसभेचा ठराव केल्यास त्यागावात तातडीने बस सेवा सुरू केली जाईल.

सरपंचांनी मांडल्या समस्या
तसेच विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन आगार प्रमुख स्वाती पाटील यांनी केले. हिंगोणीपाडा येथील माजी सरपंच सत्तारसिंग पावरा म्हणाले की, साक्री-झेंडेअंजन बस ही हिंगोणीपाडा मार्गे केल्यास त्या परिसरातील अनेक गावांमधील विद्यार्थ्यांसह प्रवाशांची सोय होवू शकेल. भावरचे सुदाम गुजर यांनी अडचण मांडतांना सांगितले की, भावेर येथून शिरपूर येथे जाण्यासाठी एकही खाजगी वाहन नसल्याने नियमीत बस सेवा करण्याची मागणी केली. बाभळाजचे जगन्नाथ महाजन, होळनांथेचे महेंद्र राजपूत व बापूसाहेब राजपूत यांनी देखील सूचना केल्यात.