ग्रामसेवकाची मोटारसायकल लांबविली

0

जळगाव। गोंविदा स्टॉपजवळील जिओनी गॅलरीसमोरून शनिवारी दुपारी अज्ञात चोरट्याने ग्रामसेवकांची मोटारसायकल चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी ग्रामसेवकाने शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द तक्रार दाखल केली आहे.

दादावाडी येथे वास्तव्यास असलेले सतिष चंद्रकांत पाटील (वय-34) हे धरणगांव पंचायत समिती येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहेत. दरम्यान, पाटील यांचा मोबाईल ना दुरूस्त असल्यामुळे ते शनिवारी दुपारी 3.30 वाजता मोबाईलमध्ये सॉफ्टवेअर टाकायचे असल्याने मोटारसायकल क्रं. एमएच.19.8337 ने गोविंदा स्टॉपजवळील जिओनी केअरला आले होते. जिओरी केअरच्या समोरच मोटारसायकल उभी करून दुकानात गेेले. दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास सॉफ्टवेअर टाकून आल्यानंतर दुकानाबाहेर आले असता त्यांना त्यांची मोटारसायकल दिसून आली नाही. आजू-बाजूच्या परिसरात मोटारसायकचा शोध घेतला मात्र मोटारसायकल मिळून न आल्याने त्यांना चोरीला गेल्याची खात्री झाली. त्यांनी लागलीच शहर पोलिस स्टेशन गाठत घडलेली घटना सांगितल्या. त्यानंतर पोलिसांनाकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात येवून शहर पोलिस ठाण्यात सतिष पाटील यांनी अज्ञात चोरट्याविरूध्द तक्रार दाखल केली आहे.