ग्रामसेवकास मारहाण केल्याप्रकरणी शहाद्यात गुन्हा

0

शहादा । तालुक्यातील लंगडी भवानी गावात 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास ग्रामसभा सुरु असतांनाच एकाने ग्रामसेवकास घरकुलाचे पैसे देत नाही, हे कारण पुढे करुन मारहाण केल्याची घटना घडली. याबाबत शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामसेवकाला मारहाण केल्याच्या निषेधार्थ ग्रामसेवक संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी काम बंद आंदोलन करुन शहादा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्रीराम कांगने यांना निवेदन देऊन निषेध नोंदविला. गेल्या 6 वर्षापासून शहादा तालुक्यातील लंगडी भवानी गावात ग्रामसेवक म्हणून सेवारत असुन दि15 ऑगस्ट रोजी सकाळी ग्रामसभा सुरु होती या सभेत 100 ते 150 ग्रामस्थ उपस्थित होते सभा सुरु असतांना सत्तर शिका-या पावरा या इसमाने अचानक येऊन गालांवर मारहाण करित मला घर कुलचे पसे का देत नाही असे म्हणत दहशत निर्माण करुन शासकीय कामात अडथळा निर्माण केला. सदर इसम चे कोणत्याही योजनेत शासनाकडून घरकुल मंजूर नाही. याबाबत शहादा पोलिसात ग्रामसेवक पावरा यांच्या फि-यादीवरुन मारहाण करुन शासकीय कामात अडथळ निर्माण केला म्हणून सत्तर पावरा विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचे वृत्त कळताच ग्रामसेवक युनियन च्या पादाधिका-यांनी निषेध नोंदवून काम बंद आंदोलन करुन युनियनचे जिल्हाध्यक्ष हिम्मतसिंग वंजारी, तालुकाध्यक्ष शरद महाराज, देवनाथ साळवे, उमेश जाधव, ए.सी.लांमगे, चेतन राठोड, मुकेश सावंत, पंडित सोनवणे, संतोष शिंदे, मनोहर खर्डे आदींसह सर्व पादाधिकार्‍यांनी गटविकास अधिकार श्रीराम कागने यांना निवेदन दिले.