ग्रामसेविकेला शिविगाळ ; पंचायत समिती सभापती पतींसह तिघांविरुद्ध गुन्हा

0

शिवीगाळ करीत जीवे ठार मारण्याची धमकी ; सांगवी सरपंचांसह अन्य एक आरोपी

यावल- यावल तालुक्यातुन चोपडा तालुक्यात बदली झाल्यानंतर पुन्हा यावल तालुक्यात बदली करून घेतल्याचा राग आल्याने ग्रामसेविकेला यावल पंचायत समिती सभापतींच्या पतीसह तिघांनी अश्‍लील शिवीगाळ करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना शुक्रवारी सकाळी यावल पंचायत समितीत घडली. या प्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

रात्री उशिरा पोलिसात गुन्हा दाखल
यावल पंचायत समितीच्या सभापतीचे पती तथा डांभुर्णीचे सरपंच, सांगवी खुर्दचे सरपंच व पंचायत समिती सदस्यांचा मुलगा अशा तिघांनी महिला ग्रामसेविका कांचन पंडीत बादशाह (रा.सांगवी खुर्द) यांना अश्लिल शिविगाळ करून मारहाण करीत जिवेठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी यावल पोेलिसात शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. ग्रामसेविका पंचायत समिती गेल्या असता तेथे सभापती पल्लवी चौधरी यांच्या दालनात सभापतींचे पती व डांभूर्णी सरपंच पुरूजीत चौधरी, सांगवी खुर्दचे सरपंच विकास गणेश पाटील व महेंद्र भगवान कोळी (रा.सांगवी खुर्द) या तिघांनी तिला तु कुणाच्या माध्यमातुन पुन्हा यावलला बदली करून घेतली, ते सांग असे सांगत वाद वाढवला. तिघांनी त्यांना अश्लील शिवीगाळ करीत मारहाण केली व जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. तपास उपनिरीक्षक सुनीता कोळपकर करीत आहे.राजकीय लोकप्रतिनिधींनी केलेल्या या कृत्यामुळे यावल तालुक्याच्या राजकीय गोटात मोठी खळबळ उडाली आहे.