किनगाव । किनगाव परिसरातील ग्रामस्थांच्या मागणीवरुन किनगाव येथे महाराष्ट्र राज्य परिवहन विद्यार्थी सवलत पास एस.टी.च्या सर्व मिळणार्या सवलतींचा विद्यार्थी पास 80 टक्के, अहिल्याबाई होळकर विद्यार्थिनी पास (इयत्ता पहिली ते दहावी 100 दहावी), सर्व्हिस पास(50 दिवसांचे भाड्यामध्ये 90 दिवसांचा प्रवास), आवडेल तेथे प्रवास (4,7,10 दिवस) लाभ मिळेल. किनगाव एस.टी.बस स्थानकावर पासेस देण्याची व्यवस्था केल्याचे जळगाव डिव्हीजनल मॅनेजर चेतना खिरवडकर, यावल आगार प्रमुख श्री.बंजारा, यावल आगार व्यवस्थापक श्री.जंजाळे यांनी ग्रामस्थांच्या मागणीवरुन कंट्रोल पॉईन्ट (पास पॉईन्ट) 27 जून 2017 पासून सुरु करण्यात येईल. तरी प्रवाशांनी या सवलतीचा लाभ घ्यावा.
ग्रामपंचायत सदस्यांचे मानले आभार
पंचायत समिती उपसभापती उमाकांत रामराव पाटील, सरपंच किनगाव बुद्रुक अशोक महाजन, शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते कडू पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी शुक्राम पाटील आणि परिसरातील ग्रामपंचायत सरपंच व ग्रामपंचायत सदस्य एम.के.राठोड मिळाल्याने परिसरात प्रवाशांना आनंद झाला. प्रामुख्याने विद्यार्थ्यांचा वेळ व पैसा वाचला. सर्वच विषयात मात्र फायदा झाला. विद्यार्थ्यांना पास काढण्यासाठी यावल किंवा जळगाव येथे वेळ व पैसा 1 दिवसाचे क्लास बुडाल्याने दिवसभर उपाशीपोटी रांगेत उभे राहावे लागत होते. या सुविधेमुळे किंनगाव परिसरातील नागरिक व विद्यार्थांना पासेसमुळे मोठ्याप्रमाणावर फायदा झाल्याने समाधान व्यक्त होत होते.