वरखेडी। सामजिक भावनेतून गावकर्यांनी एकत्र आल्यास वैयक्तिक तसेच सार्वजनिक स्वरूपाच्या अडचणीवर किती काम करता येवू शकते याचे सुरेख उदाहरण भोजे येथील ग्रामस्थांनी दाखवून दिले आहे. येथील ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने लोकसहभागातून 2 लाख रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण केल्यामुळे गावकर्यांनी घातला असून त्याचे तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे. तालुक्यातील भोजे गाव तीन हजार लोकवस्तीचे उद्दमशीलगाव असून मालवाहतूक करणार्या गाड्यांची बांधणी करणारी व अभियांत्रिकी स्वरुपाची कामे या गावात उत्कृष्टपणे होत असल्याने अनेक जिल्ह्यातून भोजे गावाचा नावलौकिक आहे. तसेच उत्कृष्ट शेती व भाजीपाला उत्पादन या विषयी हे गाव प्रसिध्द आहे. मागील दोन वर्षापासून कमी पावसामुळे दुष्काळसदृश पाणीटंचाई असल्याने ह्या परिसरातील वाणेगाव, राजुरी, सार्वे-पिंप्री यासह अनेक धरणामध्ये अत्यंल्प जलसाठा असल्याने पाणी टंचाई समस्या निर्माण झाली आहे.
तीन इंच पाईपलाईन टाकून समस्या केली दुर
भोजे गावासाठी वाणेगाव-राजुरी पाणीपुरवठा योजना असून धरणातील पाणी लवकरच आटल्याने गेल्यादोन महिन्यापासून गावात तीव्रपाणीटंचाई भासत होती. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी सरपंच दिपाली पवार, उपसरपंच नामदेव पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष अतुल जाधव, यशवंत पवार, कडूबा पाटील व ग्रामस्थांनी विचारविनिमय करून ह्या समस्येवर मात करण्यासाठी डांभूर्णी -पिंप्री धरणातून पाणी आणण्यासाठी तातडीची योजना आखली ह्या योजने खाली लोकवर्गणीतून दोन लाख रुपये खर्चाची पाईपलाईन टाकली 3 इंच व्यासाचे 210 पाईपटाकण्यात आले आहे. विशेष म्हणजे यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी सुरुवात करून पहिल्याच दिवशी 26 हजार लोकवर्गणी जमा झाली होती या उपक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य, सरपंच व उपसरपंच सह निलेश हिवाळे, योगेश जाधव, सलीमतडवी, सरिता पाटील, सुशीलाबाई जाधव, निर्मला हिवाळे, विद्या पाटील, डीगंबर उभाळे आदींनी सहकार्य केले.