ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई :-सर्वच क्षेत्राच्या विकासाला चालना देणारे हे अंदाजपत्रक असून आपण या अंदाजपत्रकाचे स्वागत. सौभाग्य योजनेतून वीज कनेक्शन नसलेल्या देशातील 4 कोटी कुटुंबाना मोफत वीज कनेक्शन देण्याची अर्थमंत्र्यांची घोषणा स्वागतार्ह आहे.
18 कोटी महिलांना उज्ज्वल गॅस कनेक्शनचा निर्णय ग्रामीण व गरीब महिलांना दिलासा देणारा. महिलाबचत गटांना 42 हजार कोटींवरून 55 हजार कोटी कर्ज देण्याचा निर्णय गरीब महिलांना सक्षम व स्वत च्या पायावर उभे करणारा आहे. नोटबंदीनंतर झालेला नुकसान भरून काढण्यासाठी लघुउद्योगांना 3700 कोटी रूपयांची तरतूद ही उद्योगांचा पाया भक्कम करणारा निर्णय आहे. जेष्ठ नागरिकांसह सर्वांसाठी काही ना काही देणारा हा अर्थसंकल्प असून मेकइन इंडियाचे प्रतिबिंब या अंदाज पत्रकातून दिसते.