चोपडा। अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटनाचे तालुक्यातील कर्मचारी बुधवार 16 ऑगस्ट 2017 पासून विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर गेले आहेत असे संघटनेच्या तालुकाध्यक्ष हेमंत बाविस्कर यांनी सांगितले.
भारतीय डाक विभाग चोपडा तालुका अंतर्गत ग्रामीण भागात एकुण 47 (सेवक) कर्मचारी सेवा बजावत आहेत अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कर्मचार्यांना 7 वे वेतन, पेन्शन योजना, रजा अशा विविध मागण्या त्वरीत लागु करण्यात यावे या मागण्या पुर्ण होत नाही तो प्रयत्न ग्रामीण भागातील सर्वच (सेवक) कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत
या सपांत अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटनेच्या हेमंत बाविस्कर तालुकाध्यक्ष, उपाध्यक्ष रमेश सोनवणे, शामकांत जोशी, गोपाळ पाटील, रमेश माळी, अब्दुल पिंजारी, विश्वनाथ पाटील, प्रल्हाद सैदांणे, रुपेश पवार आदी कर्मचारी या सपांत सहभागी झालेले आहेत. राज्यासह परराज्यातील येणार्या टपाल,रजिष्टंर, मनीआँर्डर, पञ व्यवहार आदी सेवा मिळण्यासाठी काही दिवस तरी या संपामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना वाट बघावी लागणार असल्याचे चित्र दिसून येते.