पाचोरा : 6 जानेवारी रोजी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनी पत्रकार दिनानिमित्त अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कपडा बँक’ या संकल्पनेतून गरीबांना कपडे, रुग्णांना जेवण, तसेच मुकबधीर विद्यार्थ्याना फळ, बिस्कीट वाटप करण्यात आले. दरम्यान राजकीय, सामाजिक, शैक्षकणिक व पोलीस खात्यांच्या वतीने पत्रकार बांधवांना सन्मानित करण्यात आले. पत्रकार दिनानिमित्त आमदार किशोर पाटील, नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष शरद पाटे, मुख्याधिकारी किरण देशमुख, उपमुख्याधिकारी राजेंद्र पाटील आदींनी पत्रकांराचा सन्मान केला. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकारसंघाचे जिल्हाध्यक्ष भगवान सोनार होते. प्रमुख पाहूणे म्हणून रोटरी क्लबचे सचिव रोहन पाटील, सुयोग जैन, पोलीस निरीक्षक नवलनाथ तांबे, लक्ष्मण सुर्यवंशी, ललीत खरडे, दिलीप जैन, राजेश मोरे, विनायक दिवटे उपस्थित होते. प्रास्ताविक रोहन पाटील, लक्ष्ण सुर्यवंशी यांनी तर सुत्रसंचालन व आभार अजय अहिरे यांनी केले.