आमदार संजय सावकारे यांच्या प्रयत्नातून पाच कोटींच्या निधीला राज्य शासनाकडून मंजुरी
भुसावळ- भुसावळ ग्रामीणसह तालुक्याला जोडणार्या रस्त्यांची गेल्या काही वर्षांपासून वाताहत झाल्याने रस्त्यांची कामे करण्याबाबत जनतेतून सातत्याने रेटा वाढल्यानंतर विकासकामांसाठी तसेच मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी 25/15 या शिर्षकाखाली निधी मिळण्यासाठी आमदार संजय सावकारे यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याची दखल घेत तब्बल पाच कोटी रुपयांच्या निधीला राज्य शासनाने 7 डिसेंबर रोजी मंजुरी दिली आहे. मंजूर झालेल्या कामांमध्ये शहराला लागून असलेल्या मात्र ग्रामीणमध्ये मोडणार्या वसाहतीतील रस्त्यांची दुरवस्था थांबणार असून ग्रामीण भागाचा कणा असलेल्या रस्त्यांची दुर्दशा थांबणार असल्याने ग्रामीण भागातील जनतेतून समाधान व्यक्त केले जात आहे.
या रस्त्यांचे उजळणार लवकरच भाग्य
भुसावळातील सीताराम नगरातील भाग एक व दोनमधील रस्ते, विष्णू महाजन नगर ते वृंदावन कॉलनी रोड रस्त्याचे डांबरीकरण, कुर्हे ते खंडाळा दरम्यानच्या एक किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण, खंडाळा येथील स्मशानभूमी रस्त्याचे डांबरीकरण, शिंदी येथे सार्वजनिक सभागृहाचे बांधकाम करणे, कुर्हे येथे सभागृह बांधणे, खडका गावातील रस्त्यांचे डांबरीकरण, किन्ही ते विचवा दरम्यानच्या रस्त्याचे डांबरीकरण, जोगलखेडा ते साकेगाव एक किलोमीटर अंतराचे डांबरीकरण, सुनसगाव गावात प्रवेश करणार्या एक किलोमीटर अंतराचे डांबरीकरण, बोहर्डी येथे अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण, पिंपळगाव खुर्द व बु.॥ येथे अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण, आचेगाव येथे अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण, निंभोरा येथे अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण, पिंप्रीसेकम येथे अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीरण, पिंप्रीसेकम ते सप्तश्रृंगी देवी मंदिर दरम्यानच्या रस्त्याचे काम, कन्हाळे बु.॥ येथे अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण, काहुरखेडा येथे अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण, कठोरा ते सावतर निंभोरा रस्त्याचे डांबरीकरण, वरणगाव ते दर्यापूर एक किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण, हतनूर येथे अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण, टहाकळी येथे सामाजिक सभागृहाचे बांधकाम करणे, बेलव्हाय, वराडसीम येथे अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण करणे, भिलमळी रोड ते सुरवाडे खुर्द रस्त्याचे डांबरीकरण करणे, बोहर्डी ते वढवे रस्त्याचे डांबरीकरण करणे, आचेगाव ते वढवे रस्त्याचे डांबरीकरण करणे, साईबाबा मंदिर ते तळवेल रस्त्याचे डांबरीकरण करणे, किन्ही मराठी शाळेजवळ पूलाचे बांधकाम करणे, पिंपळगाव ते करंजी रस्त्याचे डांबरीकरण करणे, भुसावळातील आरएमएस कॉलनी, समर्थ कॉलनी, अमरनाथ नगर, भुसावळ ग्रामीणमधील रस्त्याचे खडीकरण तसेच डांबरीकरण करणे, कन्हाळे बु.॥ सार्वजनिक सभागृहाचे बांधकाम करणे, भुसावळातील अयोध्या नगर, हायवेला जोडणार्या रस्त्याचे काम तसेच गटार बांधणे, भुसावळातील प्रेरणा नगरातील अंतर्गत रस्त्यांचे तसेच गटारीचे बांधकाम करण्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. लवकरच या विकासकामांना सुरुवात होणार असल्याचे आमदार संजय सावकारे यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना सांगितले.
मतदारसंघ विकास हाच ध्यास -आमदार संजय सावकारे
शहर व तालुक्यातील कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच नागरीकांकडून रस्त्यांच्या कामांबाबत सातत्याने मागणी होत असल्याने शासनाकडे निधीची मागणी करण्यात आल्यानंतर पाच कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. भुसावळ ग्रामीणसह तालुक्यातील अनेक रस्त्यांची कामे होणार असून अन्य कामेदेखील लवकरच मार्गी लागतील, असे आमदार संजय सावकारे म्हणाले. भुसावळ बसस्थानकाच्या नियोजित जागेवर संरक्षण कुंपण बांधण्यात येत असून त्याबाबत परीवहन मंत्र्यांकडे पाठपुरावा करण्यात आला. लांब पल्ल्याच्या गाड्या शहराबाहेरून लवकरच सुटतील.