पुरंदर । ग्रामीण भागातील विद्यार्थी शारिरीक सक्षम होऊन तो बौध्दीकदृष्ट्या प्रगत व्हावा, यासाठी शासन व सामाजिक संस्था सातत्याने मदत करतात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घेत उच्च शिक्षण घ्यावे, असे प्रतिपादन कात्रज दूध उत्पादक संघाचे संचालक गंगाराम जगदाळे यांनी केले. 15 ऑगस्ट निमित्ताने पुणे जिल्हा दूध संघाच्या वतीने पुरंदर तालुक्यातील गराडे आणि गराडे गावच्या बारावाड्या तसेच सोमुर्डी, थापे-वारवडी व कोडीत शाळेतील 468 विद्यार्थ्यांना सुगंधी दुधाचे वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन
15 ऑगस्टमध्ये गावात ठिकठिकाणी झेंडावंदनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. श्री नवखंडेनाथ मंदिरासमोर जगदाळे यांच्या सुगंधी दुधाचे वाटप करण्यात आले. यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच वंदना जगदाळे या होत्या. शंकरराव ढोणे विद्यालयात उपसरपंच सुनील जगदाळे, प्राथमिक शाळेत माजी सरपंच लक्ष्मी पवार, प्राथमिक आरोग्य केंद्रात ग्रापंचायत सदस्य माया शेलार, ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच वंदना जगदाळे, पोलीस-पाटील सुरेश जगदाळे यांचे हस्ते झेंडावंदन करण्यात आले.
468 विद्यार्थ्यांना सुगंधी दूध
गराडे, सोमुर्डी, थापे-वारवडी व कोडीत, मठवाडी, ढुमेवाडी, हनुमानवाडी, बांदलवाडी, दुरकरवाडी, ढोणेवाडी, रावडेवाडी, साईवस्ती अशा गराडे गावच्या बारावाड्यातील शाळेतील 468 विद्यार्थ्यांना सुगंधी दुधाचे वाटप करण्यात आले, असे जगदाळे यांनी सांगितले. यावेळी बाळासाहेब रावडे, कुंडलिक शेवते, सुनील जगदाळे, संजय घारे, माया दिक्षीत, उत्तम ढोणे, सुलोचना राऊत, लक्ष्मीबाई जगदाळे, शोभा जगदाळे, योगेश जगदाळे, काका रावडे, केंद्रप्रमुख प्रतिभा बोत्रे, ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत कुलकर्णी, तलाठी वणवे आदी उपस्थित होते. मिलिंद कोबल यांनी सूत्रसंचालन केले. तर सुरेश जगदाळे यांनी आभार मानले.