ग्रामीण भागात उच्च शिक्षणाच्या सुविधांसाठी प्रयत्न

0

फैजपुर । ग्रामीण भागातील लहानशा गावामधील विद्यार्थ्यांना शहरात शिक्षणासाठी भिती वाटते. अशा, विद्यार्थ्यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ अंतर्गत शिक्षणासाठी आणण्याचे प्रयत्न असून एसटी, एससी विद्यार्थी यांना शिक्षणासाठी हे विद्यापीठ मोफत प्रवेश देणार असल्याची माहिती विद्यापीठाचे ‘इग्नू’ च्या पुणे विभागाचे संचालक डॉ. सौनंद यांनी फैजपुर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.

फी न घेता मोफत प्रवेश देण्यात येणार
‘इग्नू’ प्रादेशिक केंद्र पुणे तर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन धनाजी नाना महाविद्यालयामध्ये करण्यात आले होते. डॉ. सौनंद म्हणाले की, कोणत्याही शाखेची पदवी शिक्षण घ्यावे ही अपेक्षा प्रत्येक विद्यार्थ्याची असतांना फी भरणे अभावी मागासवर्गीय विद्यार्थी पदवी शिक्षणापासून वंचित राहतात. मात्र, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने 12 वी नंतर बीए, बीकॉम, बीएस्सी पदवी ते डिप्लोमा पर्यंत एसटी, एससी विद्यार्थी यांना सुरुवातीपासून फी न घेता मोफत प्रवेश देण्यात येणार आहे.

शैक्षणिक साहित्य देणार
तसेच या विद्यापीठ अंतर्गत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, देखील उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती देवून ‘इग्नू’ ने उन्नत भारत अभियान सुरु केला आहे. त्याबरोबर खान्देशात ‘इग्नू’ चे जळगांव, जळगांव उमवि, फैजपुर येथील बीएड़ कॉलेज असे तीन केंद्र असून या ठिकाणी सुद्धा हा अभियान सुरु करण्याचा मानस आहे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, त्यांचे सहकारी वाय.सुब्रमण्यम, अनुराग अधिकारी यांनीही या विद्यापीठाअंतर्गत देण्यात येणार शिक्षणाची माहिती दिली. यावेळी बीएड कॉलेजच्या प्राचार्या डॉ. जयश्री नेमाडे, प्रा. विजय तायडे आदी उपस्थित होते.