जळगाव । जिल्हा पोलिस दलाच्या स्पर्धाचा समारोप 16 रोजी सायंकाळी पोलिस मैदानावर झाला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन धावपटू कवीता राऊत याच्यासह जिल्हा पोलिस दलाचे पोलिस अधिक्षक दत्तात्रय कराळे,अपर पोलिस अधिक्षक बच्चनसिंग,प्रशांत बच्छाव, डिवायएसपी सचिन सांगळे,डिवायएसपी निलोप्पल, जिल्हा क्रिडा अधिकारी सुनंदा पाटील,एमएसडब्ल्यु महाविद्यालयाचे प्राचार्या वाणी, फारूक शेख आदी उपस्थित होते.यावेळी पोलिसदल व नागरिकांमध्ये रस्सीखेच खेळ झाला,यामध्ये पोलिस दलाने 2-1 ने विजय मिळविला. तर विविध स्पर्धेतील खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.
अॅथलॅटिक स्पर्धामुळे खेळाडूंना एक प्लॅटफार्म
जळगाव पोलिस दलाचे खेळ स्पर्धाचा समारोप झाला.यावेळी अॅथलॅटिक कविता राऊत याच्या उपस्थित समारोप झाला. यावेळी वृत्तपत्र प्रतिनिधीशी बोलतांना कविता राऊत म्हणाली की, आज अॅथलॅटिक स्पर्धामुळे खेळाडूंना एक प्लॉटफार्म मिळाला आहे. पोलिस दलात भरती होतांना खेळाडूंना प्राधान्य देण्यात येते.हा त्यांना एक प्लॅटफार्म मिळतो.असेच प्लॉटफार्म मिळाल्यास सर्व खेळाडूंना आपल्या जी खंत आहे.आपल्या देशाची जी खंत आहे. अॅल्मिपिकला मेडल मिळत नाही तर ती नक्कीच पुर्ण होईल. त्याच्यासाठी माझे स्वत:चे एक उदाहरण आहे.मी सुध्दा एका गावातुन आलेली आहे. मी सगळ्या पालकांना आव्हान करेल की,मुलीना बाहेर येवू द्या. ग्रामीण भागातील मुला,मुलींमध्ये खुप टॅलेंट आहे. खेळामध्येच नाही इतर क्षेत्रामध्ये हीखुप टॅलेट असतो. एक कवीता करू शकतो तर ग्रामीण भागात अनेक कवीता आहे, असे ग्रामीण भागातील टॅलेंट बाहेर आले तर नक्कीच स्पोर्टसला चांगले नेतृत्व येईल