शिरूर । गणेगाव खालसा येथे फ्री रनर्स चॅरिटेबल ट्रस्ट पुणे, गणेगाव रनर्स व कोझी कॉर्नर शिक्रापूर यांच्या वतीने ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य शारीरिक तंदुरुस्तीबाबत जागृती व्हावी या हेतूने फ्री रनर्स-गणेगाव हाफ मेरेथॉन 2018चे रविवारी (दि.28) आयोजन करण्यात आले होते. यामध्ये राज्यभरातून 3 हजार धावपटुंनी सहभाग घेतला. यामधील सहभागी होणार्या धावपटूंना पुढील काळातील शिक्षणामध्ये याचा फायदा होणार आहे. गणेगाव खालसा (ता. शिरूर) येथे मुलांना आरोग्य व शारीरिक तंदुरुस्ती विषयक जनजागृतीसाठी या मेरेथॉनचे 2017पासून आयोजन करण्यात येत आहे.
कटके, मदने यांची हजेरी
युनिक अकॅडमी पुणे यांच्या वतीने युपीएससी व एमपीएससी स्पर्धा परीक्षेसाठी क्लास लावणार्या सहभागी धावपटूंना क्लासच्या एकून फीमध्ये तीस टक्के सवलत देण्यात येणार आहे तसेच त्यांच्या वतीने विजेत्यांना साठ हजार रुपयांची बक्षिसे देण्यात आली. महाराष्ट्र कब्बडी संघाचा कर्णधार नितीन मदने व महाराष्ट्र केसरी पै. अभिजित कटके व यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
मॅरेथॉनमध्ये तीन टप्पे
मागील वर्षी या मेरेथॉनमध्ये सातशे धावपटू सहभागी झाले होते तर यावर्षीच्या मेरेथॉनसाठी विविध राज्यासह व विदेशी धावपटूसह सहा ते ऐंशी वयोगटातील सुमारे तीन हजार धावपटूंनी सहभाग नोंदविला. यामध्ये चाळीस टक्के महिला व मुलींचा सहभाग होता. या मॅरेथॉनमध्ये पाच किलोमीटर, दहा किलोमीटर व एकवीस किलोमीटर असे तीन टप्पे करण्यात आले होते. रविवारी (दि.28) पहाटे पाच वाजता गणेगाव-रांजणगाव गणपती मार्गावरील मोकळ्या मैदानावरुन झेंडा दाखवुन मॅरेथॉनला सुरुवात करण्यात आली. या मध्ये सहभागी झालेल्या प्रथम 3 स्पर्धकांना स्मृतीचिन्ह व रकमेचा धनादेश व सहभागी खेळाडूंना टी-शर्ट व पदक देण्यात आले. या मॅरेथॅानमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने लेझीम खेळाचे सादरीकरण केले. खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या वतीने कराटेचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. हलगीच्या तालावर बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
स्पर्धेतील विजेते याप्रमाणे
5 कि.मी. धावणे- (पुरुष)
1) अक्षय मोरे (कोल्हापूर), 2) प्रताप जाधव (कोल्हापूर), 3) अभिजीत मोरे (शिक्रापूर)
5 कि.मी. धावणे- (महिला)
1) दीपाली ठाकरे (खंडाळा पोलिस ट्रेनिंग सेंटर), 2) रुक्मिनी जन्मले (खंडाळा पोलिस ट्रेनिंग सेंटर)
3) नयना चवरीवाल
10 कि.मी. धावणे- (पुरुष)
1) हिंमत दाभाडे (कोल्हापूर), 2) दिलीप राऊत (सोलापूर), 3) ज्योतीराम कौलगे (आगाशे कॉलेज)
10 कि.मी. धावणे- (महिला)
1) कोमल ढबाले, 2) दिक्षीता पवार, 3) यमुना लडकत (शाहू कॉलेज)
21 कि.मी. धावणे- (पुरुष)
1) गणेश मांढे (गरवारे कॉलेज, पुणे), 2) सतीश कासळे (डेक्कन, पुणे), 3) सौरभ जाधव (एसएनजीसी कॉलेज)
21 कि.मी. धावणे- (महिला)
1) यामिनी ठाकरे (खंडाळा पोलिस ट्रेनिंग सेंटर), 2) संपदा बुचुडे (सनस मैदान, पुणे), 3) अश्विनी शिंदे (खंडाळा पोलिस ट्रेनिंग सेंटर)