ग्रामीण रस्त्यांची कामे लवकर पूर्ण करा; आमदार संजय सावकारेंची विधानसभेत मागणी !

0

नागपूर: येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. आज विधानसभेत पुरवणी मागणीवर चर्चा सुरु आहे. भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी चर्चेत भाग घेतले. यावेळी आमदार संजय सावकारे यांनी जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांना मंजुरी मिळालेली आहे, मात्र अद्याप काम पूर्ण करण्यात आलेले नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कामांना विलंब होत असल्याचे सांगत आमदार सावकारे यांनी ग्रामीण रस्त्यांची कामे लवकर पूर्ण करा अशी मागणी केली. तसेच मुलभूत सुविधेअंतर्गतच्या कामांना दिलेली स्थगिती उठविण्याची मागणी देखील आमदार सावकारे यांनी केली.

जातवैधता प्रमाणपत्र मिळविण्यात सामान्य नागरिकांना हेलपाटे मारावे लागत असतात. नागरिकांची गैरसोय होऊ नये याची काळजी सरकारने घ्यावी अशी मागणी संजय सावकारे यांनी केली. जातवैधता प्रमाणपत्र कार्यालयात कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने देखील प्रमाणपत्र वाटपात विलंब होत असल्याचे आमदार सावकारे यांनी निदर्शनास आणून दिले.

पाणी पुरवठा योजनेअंतर्गत भुसावळ मतदार संघातील जवळपास ९० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. १० टक्के कामे बाकी आहे. मात्र हे काम अडून पडले आहे. तातडीने हे काम पूर्ण करण्याची मागणी आमदार सावकारे यांनी केली.