ग्रामीण रुग्णालयाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी 70 लाख मंजूर

0

वरणगाव नगराध्यक्ष सुनील काळे यांची माहिती
वरणगाव – वरणगाव ग्रामीण रुग्णालयाचे दुसऱ्या टप्प्याचे काम मंजूर नसल्याने ग्रामीण रुग्णालयात येणारे रूग्ण हे आरोग्य सुविधे आभावी थेट जळगावला हलवावे लागत होते. रूग्णालयाच्या बांधकामासाठी 17 नोव्हेंबर रोजी जिल्हा विकास समनव्य व सनियंत्रण समितीची सभेत नगराध्यक्ष सुनील काळे यांनी वरणगाव ग्रामीण रुग्णालयाच्या दुसऱ्या टप्पा म्हणजे पुरुष वार्ड महिला वार्ड व ऑपरेशन थेटर प्रसूतीगृह या महत्वपूर्ण कामासाठी 70 लाख रुपये निधीची आवश्यकता असल्याने 70 लाखाचा निधी मंजूर करावी, अशी आग्रही मागणी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी लावून धरली होती. याची मागणीची दखल घेत कामांसाठी 70 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी निधीची मागणी केल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी वरणगाव ग्रामीण रुग्णालयाच्या कामासाठी 70 लाख देण्याचा शब्द दिला व अंदाजपत्रक तात्काळ सादर करण्याचे आदेश जिल्हाचिकित्सक एन.एस.चौहान व सा.बां.चे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. आज जिल्हाधिकारी मोहदयानी भरसभेत दिलेला. तो शब्द पाळून वरणगाव ग्रामीण रुग्णालयाच्या दुसऱ्या टप्पा पुरुषवार्ड महिला वार्ड ऑपरेशन थेटर प्रसूतीगृह 30 खाटाचे रुग्णालय ह्या कामासाठी 2 डिसेंबर रोजी 70 लक्ष रुपयाच्या कामाला जिल्हाधिकारी मोहदयानी मंजुरी दिली. पूर्वी आरोग्य सेवा पुरेशी नसल्याने रुग्णांना जळगावला न्यावे लागत होते आता 70 लाखाच्या मंजूर निधीतून रुग्णांची सुविधा होणार आहे.

मंत्र्यांसह अधिकाऱ्यांचे मानले आभार
रुग्णांची हेळसांड होणार नाही, रुग्ण सेवेच्या दृष्टीने महत्वाचे मुख्यमंत्री ना देवेन्द्र फडणवीस व ना गिरिषभाऊ महाजन यांच्या शाश्वत सरकारच्या आरोग्य यंत्रणा बाळकटिकरणामुळे वरणगाव शहरातील आरोग्य यंत्रणा सक्षम होणार आहे. सदर मंजुरीसाठी राज्याचे वैदकीय शिक्षण मंत्री ना गिरिष महाजन, पालकमंत्री ना.चंद्रकांत पाटील,जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, खासदार ए.टी.नाना पाटील, आमदार संजय सावकारे, खासदार रक्षाताई खडसे, जिल्हाचिकिसंक डॉ.नागोराव चव्हाण यांचे आभार नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख आखलाक कामगार नेते मिलिंद मेढे यांनी मानले आहे.