वरणगाव। गेल्या महिन्यापासून ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरुपी डॉक्टर मिळत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहे. रुग्णांचे हाल होऊ नये यासाठी मंगळवार 25 रोजी वरणगाव शहर कॉग्रेस कमेटीच्या माध्यमातून जिल्हा सामान्य रुग्णालयाचे चिकीत्सक भामरे यांंना लेखी निवेदनाव्दारे मागणी करण्यात आली आहे. अन्यथा अहिंसेच्या मार्गाने, उपोषणे, रास्ता रोको, मोर्चे, घेराव करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.
आपत्कालीन परिस्थितीत डॉक्टर मिळेना
वरणगाव हे शहर नगरपालिकेचे गांव असून शहरांला 28 खेडे लागून आहे. शहरातून मुंबई -नागापूर महामार्ग गेला असून या ठिकाणी छोटेमोठे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रुणालयात औषधी, कर्मचारी स्टॉप व इतर वैद्यकिय यंत्रे कायमचे बंद असतात. याकरिता येथील सर्व राजकीय पक्षाच्या कार्यकत्यांनी रुग्णालयाला कायमस्वरुपी डॉक्टर नेमणूकीसाठी जिल्हा शल्यचिकीत्सक यांना वरणगाव रुग्णालयात बोलून भेट घेवून समस्या मांडण्यात आल्या होत्या. जळगाव जिल्ह्याचे दोन मंत्री असूनसुध्दा एक आरोग्यमंत्री असतांना येथील गोरगरीब मजूर वर्ग, विदयार्थी व इतर नागरीकांना शासनाची आरोग्य सेवा मिळत नसेल तर मंत्री काय? कामाचे रुग्णालयाला लवकरात लवकर कायमस्वरूपी डॉक्टराची नेमणूक करण्यात यावी अन्यथा राष्ट्रीय कॉग्रेसआयचे कार्यकर्ते अहिंसेच्या मार्गाने, उपोषण, रास्ता रोको, मोर्चे, अधिकार्यांना घेराव करण्याचा इशारा देखील निवेदनात म्हटले आहे. वरणगाव शहराचे कॉग्रेसचे शहर अध्यक्ष ऐहतेशामोद्दीन के. काझी, जी.एस. काझी, राजु पालीकर, फिरोजशेख आदीच्या निवेदनात स्वाक्षर्या आहेत.