वरणगाव। ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकार्यांची बदली झाल्यामुळे संपूर्ण रुग्णालयाचा कारभार वार्यावर आहे. त्यामुळे वरणगाव शहर व परिसरातून औषधोपचार करण्यासाठी येणार्या रुग्णांना उपचाराअभावी माघारी परतावे लागत आहे. त्यामुळे याठिकाणी वैद्यकीय अधिकार्यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी महिला दक्षता समितीच्या सदस्या सविता माळी यांनी केली आहे.
यासंदर्भात त्यांनी जिल्हा रुग्णालयास निवेदन दिले आहे. रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे नाईलाजास्तव खाजगी रुग्णालयांमध्ये जास्तीचे पैसे भरुन उपचार घ्यावे लागत आहे. रुग्णालयास इतरही खेडी जोडण्यात आली असल्यामुळे गोरगरिब रुग्ण येथे उपचारासाठी येतात. तसेच वरणगाव शहर हे महामार्गावर असून अपघात झाल्यास आपत्कालीन उपचार देखील केले जातात. मात्र वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे अडचणी येत आहे. त्यामुळे लवकरात लवकर वैद्यकीय अधिकार्याची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी सविता माळी यांनी केली आहे.