नागपूर : सिल्लोड, जि.औरंगाबाद येथील उपजिल्हा रुग्णालयात सीसीटीव्ही दुरुस्तीबाबत जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यामार्फत कार्यवाही सुरु आहे. येथील सुरक्षेबाबत संबंधितांस सूचना देण्यात आल्या आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या वेळी सांगितले. या रुग्णालयातून नवजात बालिका पळविल्या संदर्भात पोलीस तपास करीत आहेत. हा तपास व्यवस्थित सुरु आहे. तथापि आवश्यकता भासल्यास सीआयडीमार्फतही तपास केला जाईल, असेही सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले.